Sangola Crime News Saamtv
महाराष्ट्र

Sangola Crime: वॉकींगसाठी घराबाहेर पडला अन् घडलं भयंकर... माजी सहायक पोलीस निरीक्षकाचा निर्घृण खून; सांगोल्यात खळबळ

Sangole News: याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

भारत नागणे

Vasud Crime News: सांगोला तालुक्यात एका माजी सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील वासूद गावात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सूरज विष्णू चंदनशिवे( वय 42 ) असे खून झालेल्या माजी सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.(Crime News IN Marathi)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, सूरज चंदनशिवे (Suraj Chandanshive) हे रात्री ११ वाजायच्या सुमारास वाॅकींग करण्यासाठी घराबाहेर पडले होते. बराच वेळ झाला तरी घर परत आले नाहीत म्हणून घरच्या लोकांनी त्यांच्या मोबाईवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद येत होता.

त्यानंतर घरच्या मंडळींनी त्यांची शोधाशोध सुरू केली. आज सकाळी सूरज चंदनशिवे यांचा सांगोला- वासूद रस्त्याच्या लगत अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने पाठीवर वार करून खून केल्याचे समोर आले. या भयंकर घटनेने सांगोल्यात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिस ठाण्याचे (Sangola Police Station) पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळी जावून‌ पाहणी केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ही निर्घृण हत्या का झाली याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT