Pandharpur Crime News saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Crime News : आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला पाेलीस जबाबदार, अल्पवयीन मुलीच्या पालकांचा इशारा

संबंधित मुलीचा शाेध सुरु आहे असेही पाेलिसांनी स्पष्ट केले.

भारत नागणे

Sangola News : साेलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समाेर आली आहे. या घटनेतील मुलीच्या पालकांनी पाेलिसांना तपास लवकरात लवकर करावा अन्यथा आत्मदहन करु असा इशारा दिला आहे. या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत. (Maharashtra News)

ही घटना सांगोला तालुक्यात घडली आहे. या संदर्भात सांगोला पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या कुटुंबियांनी दाखल केलेली आहे. संबंधित मुलीच्या जीवाला धोका असल्याचे पालिकांनी म्हटले आहे.

पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका करावी अन्यथा आत्मदहन केले जाईल असा इशारा मुलीच्या पालकांनी पाेलिसांना दिला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पाेक्साे गुन्ह्यातील एका संशयिताने जामिनावर सुटल्यावर अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद तिच्या पालकांनी दिली आहे. संबंधित मुलीचा शाेध सुरु आहे असेही पाेलिसांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack: 99% टक्के लोकांना 'या' एका कारणामुळे येतो हार्ट अटॅक; तुम्हीही ही चूक करत नाही ना?

Maharashtra Dasara Melava Live Update : मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्यासाठी नारायण गडाकडे रवाना

Buldhana : समृद्धी महामार्गावर अवैध गुटख्याची तस्करी; एक कोटी १३ लाखांचा गुटखा जप्त

Elon Musk : एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल | VIDEO

Shreya Bugde : नवरी नटली! श्रेया बुगडेचं अस्सल मराठमोळं सौंदर्य, पाहा PHOTOS

SCROLL FOR NEXT