popatraon deshmukh  Saam tv
महाराष्ट्र

शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या वडिलांचं निधन; सांगोला परिसरात शोककळा

popatrao deshmukh death : शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपटराव देशमुख यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने सांगोला परिसरात शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

बाबासाहेब देशमुख यांच्या वडिलांचं निधन

पोपटराव देशमुख यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पोपटराव यांच्या जाण्याने सांगोला परिसरात शोककळा

सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचे वडील आणि प्रगतशील शेतकरी पोपटराव देशमुख यांचं सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यातच त्यांचं रात्री निधन झालं. दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. आज मंगळवारी सकाळी मोहोळ तालुक्यातील पेनूर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने सांगोला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोपट देशमुख हे मूळचे मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील रहिवासी होते. त्यांचे वडील दिवंगत गणपतराव देशमुख हे राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय होते. गणपतराव हे विक्रमी अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, इतका मोठा राजकीय वारसा आणि पार्श्वभूमी असतानाही पोपट देशमुख यांनी कधीही सक्रिय राजकारणात सहभाग नोंदवला नाही. ते साधेपणाने आपल्या मूळ गावी राहून सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत होते.

आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या राजकीय प्रवासात पोपट देशमुख यांचे मोलाचे योगदान असल्याचे मानले जाते. शांत, संयमी व मनमिळावू स्वभावामुळे सांगोला परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एका मुलगा आणि एका मुलगी असा परिवार आहे. सांगोला मतदारसंघात शेकाप आणि गणपतराव देशमुख यांचं वर्चस्व राहिलं आहे. गणपतराव देशमुख यांनी ११ वेळा विक्रमी आमदार झाले आहेत. त्यांनी २०१४ साली ८७ वर्षांचे असताना शेवटची निवडणूक लढली. त्या निवडणुकीत जिंकलेही.

पुढे २०१९ साली त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख हे काही मतांच्या फरकाने पराभूत झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाबासाहेब देशमुख यांच्या रुपाने पुन्हा देशमुख घरात आमदारकी आली. बाबासाहेब देशमुख निवडणुकीला उभे राहिले, त्यावेळी त्यांचे वडील पोपटराव देशमुख यांनी जोरदार प्रचार केला होता. त्यांच्या विजयात पोपटराव यांचा मोलाचा वाटा होता. ते स्वभावाने शांत आणि संयमी होते. त्यांची सोमवारी रात्री प्राणज्योत मालवली. पोपटराव यांच्या निधनाने सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Diabetes Diet Tips: डायबिटीजमध्ये ब्रेड खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हे 3 ब्रेड ठरतील बेस्ट

Government Scheme: खुशखबर! महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला ₹३००० येणार; नवीन योजनेची घोषणा

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश भाऊंची बॉक्स ऑफिसवर हवा, दुसऱ्या सोमवारी 'राजा शिवाजी'नं किती कमावले?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार; लाभार्थी महिलांचा आकडा आला समोर, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT