Audio Clip Saam TV
महाराष्ट्र

'काय झाडी, काय डोंगारनंतर आता सांगोल्याच्या शेतकऱ्याची 'ओके' ऑडिओ क्लिप व्हायरल

शेतकऱ्याने चक्क अ‍ॅमेझॉन कंपनीवरून जनावरांसाठी चाऱ्याची नोंदणी करण्यासाठी फोन केला.

भारत नागणे

पंढरपूर - काय ती झाडी,काय ते डोंगर ,काय ते हाटेल या आमदार शहाजी बापू पाटील यांच्या डायलाॅगची देशभरात चर्चा सुर असतानाच सांगोला (Sangola) तालुक्यातील आणखी एका शेतकऱ्याची (Farmer) ऑडीओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. शेतकऱ्याने चक्क अ‍ॅमेझॉन कंपनीवरून जनावरांसाठी चार्याची नोंदणी करण्यासाठी फोन केला. अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांबरोबर झालेल्या संवादाची ऑडीओ क्लिप सध्या तुफान व्हायरल होत आहे.

हे देखील पाहा -

मागील पाच ते सहा दिवसांपासून सोलापूर (Solapur) जिल्ह्यासह सांगोला तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे जनावरांचे हाल सुरू आहेत. त्यातच जनावरांना चाराही शेतातून आणणे कठीण झाले आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील आलेगाव येथील शेतकरी राजेंद्र पाटील या शेतकऱ्याने जनावरांच्या हिरव्या चार्यासाठी चक्क अ‍ॅमेझॉन कंपनीला फोन लावला. त्यानंतर शेतकरी आणि कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या संवाद सध्या तुफान व्हायरल होत आहे.

सांगोला तालुक्यातील आलेगाव येथील शेतकरी राजेंद्र पाटील हे मराठी विषयाचे पदवीधर असून ते शेती करतात. त्यांच्याकडे ५६ एकर कोरड वाहू शेती आहे. किड रोगामुळे डाळिंब बागा नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे दूध उत्पादन हाच पर्याय त्यांच्यासमोर आहे. त्यातच आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे या शेतकऱ्याने अ‍ॅमेझॉनवर चाऱ्याची मागणी केली आहे. शेतकरी राजेंद्र पाटील या शेतकऱ्याने जनावरांसाठी हिरव्या चाऱ्यासाठी चक्क अ‍ॅमेझॉन कंपनीला फोन लावला आणि चाऱ्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT