Sangli Shocking Saam tv
महाराष्ट्र

Sangli Shocking : हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त; सांगलीत एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्यायलं, दोघांचा मृत्यू

Sangli Shocking News : सांगलीत एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याची घटना घडलीये. या घटनेने परिसरात खळबळ उडालीये.

विजय पाटील

Sangli Crime : सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. सांगलीत एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केलं आहे. या घटनेत सासू आणि सूनेचा मृत्यू झाला आहे. तर बाप-लेकाची प्रकृती गंभीर आहे. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे भागात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्रशान केल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये दोन महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. रमेजा अल्लाउद्दीन पाटील (वय ४५) आणि काजल समीर पाटील (वय ३०) असं या सासू-सुनेची नावे आहेत. तर अल्लाउद्दीन पाटील आणि समीर पाटील या बाप लेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

दोघांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नांगोळे गावामध्ये ढालगाव रस्त्यालगत पाटील कुटुंबीयांचं घर आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे. या घटनेनंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरु केला आहे. मात्र हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून झाला आहे,हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. तर ही आत्महत्या की घातपात आहे, याबाबत पोलीस तपास करत आहे. या घटनेमुळे कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.

बारामतीत बँकेतच अधिकाऱ्याची आत्महत्या

पुण्याच्या बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरी बँक ऑफ बडोदाचे मुख्य प्रबंधक शिवशंकर मित्रा यांनी गुरुवारी मध्यरात्री बँकेतच आत्महत्या केली. त्यांनी बँकेच्या कामाच्या अतिरिक्त दबावाला कंटाळून आत्महत्या केली. यासाठी कोणालाही जबाबदार धरु नये, पत्नीला उद्देशून तिने माफ करावे, असंही त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT