Sangli Crime News, Satara , Kolhapur , Solapur Saam TV
महाराष्ट्र

दाेन टाेळ्या तडीपार; सातारा, सांगली, काेल्हापूर, साेलापूर जिल्ह्यात प्रवेशास मनाई

वारंवार दाेन्ही टाेळ्यांकडून कायद्याचे पालन हाेत नव्हते.

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील उगारे टोळी आणि जत तालुक्यातील बनपट्टी या दोन टोळ्या तडीपार करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी ही कारवाई केली आहे. बनपट्टी या टोळीला सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या तीन जिल्हयातुन एक वर्षे करिता तडीपार तर उगारे टोळीला सांगली, सोलापूर, सातारा (satara) या तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईने गुन्हेगारीला आळा बसेल असा दावा पाेलीसांचा (police) आहे.

जत पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपारी टोळी प्रमुख विकास अशोक बनपट्टी, आकाश अशोक बनपट्टे, सागर अशोक पाथरुट या टोळीविरुद्ध सन 2018 ते 2022 मध्ये जत पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये टोळीची दहशत रहावी म्हणुन खुनाचा प्रयत्न करणे, घराविषयी आगळीक करुन गर्दी मारामारी करणे, घातक शस्त्रानिशी गंभीर दुखापत करणे, शासकिय आदेशाचा अवमान करणे, लोकांना शिवीगाळ करणे, दमदाटी व मारहाण करणे असे शरिराविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे 11 गुन्हे आणि 3 अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. हे कायदा न जुमाननारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये पोलीस निरीक्षक, जत पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता. याची दखल घेत पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी ही कारवाई केली आहे.

तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये टोळी प्रमुख प्रमोद उगारे, प्रमोद माने, कृष्णा उनऊने, या टोळी विरुद्ध 2014 ते 2022 या दरम्यान खुनाचा प्रयत्न करणे, चोरून वाळूची वाहतूक करणे, गर्दी मारामारी घातक शस्त्राद्वारे जाणीवपूर्वक दुखापत करणे, मालमत्ता जबरीने घेण्यासाठी जाणीवपूर्वक दुखापत करणे, हल्ल्या करण्याच्या पूर्व तयारीने घरात अतिक्रमण करणे, असे गंभीर स्वरूपाचे नऊ गुन्हे दाखल आहेत. या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये पोलीस अधीक्षक दीक्षित दीक्षित गेडाम यांनी कारवाई केली आहे. या टोळीला सांगली, सोलापूर (solapur), सातारा या तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट प्रकरणातील आरोपी मनिषा वाघमारेला "वर्टिगो" आजार

Gautami Patil-Bhau Kadam : 'हिल हिल पोरी हिला...'; गौतमी पाटील अन् भाऊ कदम यांच्या केमिस्ट्रीची जादू, पाहा Unseen Photo

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 92% ते 283% पर्यंत वाढ होणार? सरकार किती वाढवणार फिटमेंट फॅक्टर? वाचा...

कांदा भजी खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा फणसाची भजी, सोपी रेसिपी

LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

SCROLL FOR NEXT