Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime News : सामाजिक कार्यकर्ते असल्याचे भासवत...15 लाखांची खंडणीप्रकरणी सांगलीत तिघांना अटक

या प्रकरणी संबंधिताने उपचारानंतर सर्वांविरोधात पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली.

विजय पाटील

Sangli Crime News : सांगली शहरातील एकास १५ लाख रुपयांची खंडणी मागत त्यातील साडेसात लाख रुपये वसूल करत उर्वरित रकमेसाठी धमकी देणाऱ्य तिघांना पोलीसांनी जेरबंद केले. हे तिघेजण सामाजिक कार्यकर्ते म्हणून वावरत होते अशी माहिती पाेलीसांकडून मिळाली. (Maharashtra News)

एका कृषी उद्योजकाकडे त्यांनी पंधरा लाखांची खंडणी मागत रक्कम दिली नाहीतर अट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याचीही धमकी देण्यात आली होती. प्रशांत लक्ष्मण सदामते (वय ३६, रा. अंजनी, ता. तासगाव), विनोद बाळासाहेब मोरे (४२, रा. खंडेराजुरी, ता. मिरज), मोनिष संजय 'लोखंडे (२४, रा. हातनूर, ता. तासगाव), विठ्ठलराव विश्वासराव जाधव आणि लता विश्वासराव जाधव (दोघेही रा. पायापाचीवाडी, ता. मिरज) अशी संशयितांची नावे आहेत.

यातील प्रशांत सदामते, विनोद मोरे आणि मोनिष लोखंडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सांगली मधील मुकुंद हणमंत जाधवर यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जाधवर यांच्या कंपनीच्या कारभाराविरोधात आंदोलनाची धमकी देत संशयितांनी खंडणी मागितली. या त्रासाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारानंतर त्यांनी सर्वाविरोधात फिर्याद दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT