Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : यात्रेवरून परतताना सांगलीत मध्यरात्री तरुणांची हुल्लडबाजी; पोलिसांकडून चोप

Sangli : रविवारी रात्री दोन हजाराहून अधिक तरुण दुचाकी गाडीवरून सांगलीकडे परत येत असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास संपूर्ण शहर झोपेत असताना तरुण हॉर्न वाजवत घोषणाबाजी करत हुल्लडबाजी करत घराकडे येत होते

विजय पाटील

सांगली : कर्नाटकातील चिंचणी येथे माघी पौर्णिमेला मायाक्का देवीच्या यात्रेला अनेक भाविक गेले होते. यात्रा संपल्यावर घरी परत येत असताना मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुण रस्त्याने हुल्लडबाजी करत येत होते. सांगलवाडीतील या तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. यामध्ये ३५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर काहीं तरुणांनी गाड्या रस्त्यावर टाकून पळ काढला आहे.

कर्नाटक राज्यातील चिंचणी येथे माघी पौर्णिमेला दरवर्षी मायाक्का देवीची यात्रा भारत असते. या यात्रेला बैलगाडीतून किंवा घोडागाडीतून शेकडो भावी परंपरेप्रमाणे जात असतात. तर अनेकजण आपापल्या पद्धतीने दुचाकी किंवा गाडीने जात असतात. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील अनेकजण यात्रेला जात असतात. नुकताच हि यात्रा पार पडली असून भाविक यात्रेला जाऊन परतत आहेत. 

मध्यरात्री तरुणांची हुल्लडबाजी 

मायाक्का देवीची यात्रा संपल्यावर भाविक घरी परतत असतात. याचवेळी घोडागाड्या पळवत असताना त्यासोबत दुचाकी असतात. असे प्रत्येक वर्षी असते. मात्र रविवारी रात्री दोन हजाराहून अधिक तरुण दुचाकी गाडीवरून सांगलीकडे परत येत असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास संपूर्ण शहर झोपेत असताना तरुण हॉर्न वाजवत घोषणाबाजी करत हुल्लडबाजी करत घराकडे येत होते. 

पोलिसांनी अडवून दिला चोप 

जोरजोरात आवाज करत दुचाकीने जाणाऱ्या तरुणांच्या हुल्लडबाजीने नागरिक घाबरून जागे झाले होते. तर याबाबत पोलिसांना देखील माहिती मिळाली होती. दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चाप लावण्यासाठी सांगलीच्या हार्बर रोड टिळक चौकात अडवून चांगलाच चोप दिला. तर यावेळी काही तरुणांनी गाड्या टाकून पळ काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT