Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: खोटा गुन्हा काढून घेण्यासाठी पाच लाखाची मागणी नंतर धमकी; नैराश्यातून तरुणाचे टोकाचे पाऊल

विजय पाटील

सांगली : जातीवाचक शिवीगाळ केल्याचा दाखल झालेला खोटा गुन्हा आणि हा गुन्हा काढून घेण्यासाठी पाच लाख रुपयांची होत असलेली मागणी. शिवाय तुझे लग्न (Marriage) होणार नाही, तुला न्यायालयात बघून घेतो अशी दिली जात असणारी धमकी या सगळ्यानंतर आलेल्या नैराश्यातून एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (Sangli News) सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पोसेवाडी गावात घडली आहे. महेश सुभाष जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. (Live Marathi News)

पोसेवाडी (सांगली) येथील महेश जाधव याने शनिवारी दुपारी घराजवळ असलेल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. महेश हा केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान सुनील जाधव यांचा भाऊ आहे. त्याच्यावर गेल्या वर्षी पोलिसात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल होता. शनिवारी दुपारी महेशने आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यावेळी ग्रामस्थ व नातेवाइकांनी महेश याच्यावर राजकीय हेतू ठेवून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल असल्याने तसेच सरपंच अंकुश ठोंबरे, उपसरपंच सागर जाधव यांच्यासह धर्मराज जाधव, दादासाहेब दुशारेकर, महेंद्र मोहिते, नितीन खुडे यांनी त्याला हा खटला न्यायालयातून काढून घेण्यासाठी पाच लाख रुपये दे, नाहीतर तुझे लग्न होणार नाही तसेच न्यायालयात तुला बघून घेतो, अशी धमकी दिल्याने महेशने आत्महत्या केल्याचा आरोप केला.

ग्रामस्‍थांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

महेशने आत्महत्या केल्यानंतर ग्रामस्थांनी विटा पोलिस ठाण्यासमोर मृतदेह नेत संबंधितांवर गुन्हा आणि त्यांना तात्काळ अटक होत नाही. तोपर्यंत महेशचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी पोलिस (Police) ठाण्यासमोर ठिय्या मारला. त्यानंतर पोलीसांनी सरपंच ठोंबरे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सरपंच अंकुश नामदेव ठोंबरे, उपसरपंच सागर जाधव, धर्मराज जाधव, दादासाहेब दुशारेकर, महेंद्र मोहिते व नितीन खुडे या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून यातील सरपंच अंकुश ठोंबरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT