Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: वाऱ्याने एक एकर क्षेत्रातील द्राक्षबाग भुईसपाट; शेतकऱ्याचे दहा लाखाचे नुकसान

वाऱ्याने एक एकर क्षेत्रातील द्राक्षबाग भुईसपाट; शेतकऱ्याचे दहा लाखाचे नुकसान

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीच्या तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील विलास धोंडीराम शिंदे यांची हाता तोंडाला आलेली (Sangali News) एक एकर द्राक्ष बाग वाऱ्याने स्टे तार तुटून कोसळली. या घटनेत (farmer) शेतकऱ्याचे तब्बल १० लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Breaking Marathi News)

विलास शिंदे यांची चिंचणी गावालगत माणिक चमन जातीची एक एकर द्राक्षबाग (Vineyard) आहे. वातावरण खराब असतानाही त्यांनी यंदा चांगल्या प्रतीची द्राक्षे तयार केली होती. १३० रुपये दराने व्यापाऱ्याने बाग ठरविली होती. व्यापारी दोन दिवसात हा माल काढणार होता. मात्र गेल्‍या दोन– तीन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. यात तीन दिवस झाले जोरदार देखील वारा सुटत आहे.

शेतकऱ्याने फोडला हंबरडा

जोरदार वारा असल्‍याने द्राक्षाचे वजन मंडप पेलू शकला नाही. तारा तुटून स्टे उपसून द्राक्षबाग भुईसपाट झाली. सायंकाळी सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. कोसळलेली द्राक्षबाग बगून शेतकर्‍याने हंबरडा फोडला. हाता- तोंडाशी आलेला माल मातीमोल झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Accident : प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात, रेसिंग दरम्यान गाडीवरील नियंत्रण सुटले अन्...

Maharashtra News Live Update: राज्यातील नऊ जिल्ह्यात उद्यापासून शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन खत विक्री सुरुवात होणार

Weather Update : पुढील काही तासांत पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १५ राज्यांना अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Accident : अचानक सीएनजीचा स्फोट अन्...; २ आमदारांच्या गाडीचा भयानक अपघात, राजकारणात खळबळ

Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

SCROLL FOR NEXT