Sangli Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Sangli Water Crisis : सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई; अनेक गावात आठवड्यातून एकदाच मिळतेय पाणी

Sangli News : दरवर्षीच्या उन्हाळ्यात सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवत असतात. मात्र यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा पाणी समस्या उद्भवणार नाही; असे चित्र जाणवत होते

विजय पाटील

सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागताच सांगली जिल्ह्यातील अनेक गावांत पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यंतरातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून या गावांमध्ये टँकरचे वारे वाहू लागले आहेत. सांगली जिल्ह्यातील काही गावांमध्ये आतापासून आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले असून आगामी काळात हे चित्र अधिक भीषण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

दरवर्षीच्या उन्हाळ्यात सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवत असतात. मात्र यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा पाणी समस्या उद्भवणार नाही; असे चित्र जाणवत होते. परंतु दरवर्षीप्रमाणे यंदा देखील फेब्रुवारीमध्येच पाणीटंचाईचा सामना जिल्ह्यातील काही गावांमध्ये करावा लागत आहे. अर्थात या गावातील नागरिकांना आतापासूनच ट्रॅकरच्या भरोशावर रहावे लागत आहे.  

नियोजनाचा अभाव प्रमुख कारण 

या वर्षी देखील  काही ठिकाणी पाणीटंचाई आहे. वीज टंचाई, नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर ही पाणीटंचाईची कारणे आहेत. फेब्रुवारी महिना असूनही जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. सांगली, मिरजेसारख्या शहरांमध्ये अजून तरी पाण्यावरून स्फोटक स्थिती तयार झालेली नाही. काही शहरे आणि गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असली तरी त्यामागचे कारण नैसर्गिक कमी आणि नियोजनाचा अभाव हेच अधिक दिसते. 

तीन तालुक्यांमध्ये अधिक समस्या 

टँकरची गरज ही लोकांपेक्षा सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचीच अधिक असल्याचे जाणवते. सध्या सुमारे पंचवीस गावे आणि वाडे पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. यात सर्वाधिक टँकर जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात लागण्याची शक्यता आहे. काही विस्तारित भागातही टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे, मात्र त्याचे प्रमाण कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT