सांगली : सांगलीच्या भिलवडी येथील कृष्णा नदी पात्रात बैल पडला. आणि मगरीच्या तावडीत सापडला. या बैलाला (Sangli News) मगरीच्या तावडीतून तब्बल चार तासाच्या धडपड करून युवकांनी बैलाची अखेर सुटका केली. हा थरार (Krishna River) कृष्ण नदीमध्ये पाहायला मिळाला. (Tajya Batmya)
भिलवडीतील साठेनगरमधील अक्षय मोरे यांनी आटपाडी येथील बाजारातून तब्बल ७० हजार रुपयाचा देशी बैल खरेदी केला. टेम्पोतून त्याला येथे आणण्यात आले. गाडीतून खाली उतरत असताना ट्रॅक्टरचा हॉर्न ऐकून बैल दचकला आणि डावीकडून तो कृष्ण नदी काठाला पळाला. यावेळी युवकांनी त्याला पकडण्यासाठी दोरीचा फास केला. मात्र तो फास चुकवुन बैल नदीपात्रात पडला.
मगरींनी केला पाठलाग
बैल हा दुष्काळी भागातील असल्याने नदीचे पाणी पाहून तो सैरभैर झाला. पोहत तो पैलतीरावर अंकलखोपच्या दिशेने चालला. याच दरम्यान नदीपात्रात तीन- चार मगरींनी त्याचा पाठलाग सुरू केला. बैल मगरींना चकवा देत तो पोहत गेला. अखेर त्याने पैलतीर गाठली यावेळी काही अंतरावर मगर फिरत होत्या. युवकांनी मदतीसाठी नावाडी नितीन गुरू यांना तात्काळ घटनास्थळी पाचारण केले. आणि तब्बल चार तासाने बैलाला बाहेर काढण्यात यश आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.