Sangli Crime News Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime News : चोरीच्या दुचाकी विक्री करत मौजमस्ती; विक्री करतानाच झाला भांडाफोड, १९ मोटारसायकली जप्त

Sangli News : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना पथकाला अमोल साबळे बिना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन विश्रामबाग परिसरातील पालाश बिल्डकॉन जवळ फिरत असल्याची माहिती

विजय पाटील

सांगली : नवीन वर्षाच्या सुरवातीलाच शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरून विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या सराईताकडून चोरीच्या तब्बल १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने विश्रामबाग परिसरात सदरची कारवाई केली आहे. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.  

सांगली पोलिसांनी चिंचणीगाव तालुक्यातील तासगाव येथील अमोल संभाजी साबळे असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. दरम्यान जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरी घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना पथकाला सराईत अमोल साबळे हा बिना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन संशयित रित्या विश्रामबाग परिसरातील पालाश बिल्डकॉन जवळ फिरत असल्याची माहिती मिळाली. 

सापळा रचत घेतले ताब्यात 

मिळालेल्या माहिती नुसार पथकांने परिसरात सापळा रचून साबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली मोटारसायकल बाबत कसून चौकशी केली असता त्याने ती दुचाकी मिरजेतील भोमाज हॉस्पिटल जवळून काही दिवसांपूर्वी चोरली केल्याचे सांगितले. तसेच ती विक्री करण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. यानंतर त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सांगली, विश्रामबाग, मिरज, संजयनगर, इचलकरंजी, शाहूपुरी, शिवाजीनगर येथून आणखी मोटारसायकली चोरल्याचे सांगितले.  

८ लाख १० हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अमोल याने चोरलेल्या मोटारसायकली त्याचा मित्र सागर उत्तर पाटील (रा. चिंचणी) याच्या पत्र्याच्या शेडमध्ये लावल्या असल्याचे सांगितले. यानंतर पथकांनी चिंचणी येथे जात त्याठिकाणी छापा टाकून विविध कंपन्यांच्या तब्बल १९ दुचाकींसह ८ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT