Sangli Flood News Saam tv
महाराष्ट्र

Sangli Flood News : पुराच्या पाण्यात वाहून गेला; रात्र काढली झाडावर बसून

Sangli News पुराच्या पाण्यात वाहून गेला; रात्र काढली झाडावर बसून

विजय पाटील

सांगली : राज्यातील अनेक भागात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. यात सांगली जिल्ह्यात देखील पाऊस (Heavy Rain) झाल्याने नदीला पूर आला होता. सांगलीच्या (Sangli News) शिराळा तालुक्यातील लादेवाडी येथील बाजीराव खामकर हा गुरुवार (२७ जुलै) रात्री उशिरा काखे मांगले वारणा नदीवरील पुलावरून पुरात वाहून गेला. सुदैवाने तो झाडाला अडकला व रात्रभर तेथेच बसून होता. (Latest Marathi News)  

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील नदीतील पाण्याचा प्रवाह जलदगतीने असल्याने बाजीराव खामकर हा पाण्यातून वाहून गेला. बुडत्याला काटीचा आधार या म्हणीप्रमाणे त्याला एका झाडाचा आधार मिळाला आहे. आणि तो रात्रभर नदीच्या मधोमध असणाऱ्या झाडावर जाऊन बसला. रात्र त्याने अशीच जागून काढली.  

सकाळ झाली व वाचविण्यासाठी याचना 

सकाळी परिसरातील शेतकरी शेतात जात असताना त्याने पुराच्या पाण्यात अडकल्याचे ओरडून सांगितले. ही बातमी गावात पसरताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांची नदी काठावर एकच गर्दी झाली. सध्या घटनास्थळी शिराळा (Shirala) तहसीलदार, शिराळा पोलीस, तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित असून त्याला सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे प्रकाश साबळे यांचा रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात पक्षप्रवेश

खासदार संजय पाटलांचा संयम सुटला! पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दिला दम, पोलिसांसमोरच हायव्होल्टेज ड्रामा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं 30000 रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

SCROLL FOR NEXT