Swabhimani Shetkari Sanghatna Saam tv
महाराष्ट्र

Sangli District Bank : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात स्वाभिमानीचे बोंबाबोम आंदोलन; टाळे ठोकण्याचा दिला इशारा

Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जाची वसुली सक्तीने करण्यात येत आहे.

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून होत असलेली कर्ज वसुली व वाटप धोरणाविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. (Sangli) आज बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बोंबाबोंब आंदोलन करत बँकेच्या धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला. (Breaking Marathi News)

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांना (Farmer) देण्यात आलेल्या कर्जाची वसुली सक्तीने करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे बँकेतल्या बड्या कर्जदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कर्जाची सक्तीने होत असलेली वसुली तातडीने थांबवावी. तसेच बड्या थकबाकीदारांची वसुली करण्यात यावी; अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghatna) करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर बँकेला ठोकणार टाळे 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. तसेच बँकेचे मनमानी कारभार न थांबल्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयाला टाळे ठोकू; असा इशारा यावेळी स्वाभिमानीकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT