Supriya Sule Saam tv
महाराष्ट्र

Supriya Sule : दिल्लीची महाराष्ट्रावर नेहमीच वाईट नजर; सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका

Sangli News : खानापूर विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत बोलत होत्या

विजय पाटील

सांगली : अदृश्य शक्तींनी कधी महाराष्ट्रावर प्रेम केले नाही. तर दिल्लीची नजर नेहमीच महाराष्ट्रावर वाईट राहिली आहे; अश्या शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच महाराष्ट्रातलं राजकारण गलिच्छ झालं. हे दुर्दैवी आहे; अशी खंत देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना खासदार सुप्रिया सुळे या सांगलीच्या (Sangli) आटपाडी येथे खानापूर विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत बोलत होत्या. (Supriya Sule) यावेळी त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर सडकडून टीका केली आहे. 

ती माझ्या आई-आजोबांची शेताची कमाई

माझ्यावर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याची टीका होते. पण सोन्याचा चमचा घेऊन आलो. यात माझी काय चूक? असा सवाल उपस्थित करत, जे काही माझं आहे. ते माझ्या आई-आजोबांची शेताची कमाई आहे. कोण्या ईडी, सीबीआयची नाही; अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भाजपावर टीका देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

इंजिन धावणार, सेनेसोबत युती जवळपास निश्चित! पुण्यात मनसेच्या मुलाखतींना सुरुवात|VIDEO

Maharashtra Live News Update: संभाजीनगर मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटप बैठकीला सुरुवात

Skin Care: सॉफ्ट आणि फ्रेश चेहरा हवाय? मग रोज तुमच्या सोयीनुसार ५ मिनिटांसाठी फॉलो करा 'हा' उपाय

मित्रानेच काटा काढला! २६ वर्षाच्या निलेशचा खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन् जंगलात फेकला

SCROLL FOR NEXT