Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : चक्क सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी; खास बनविला आठ तोळ्याचा वस्तरा

Sangli News : सोन्यासारख्या ग्राहकांची सेवा सोन्याच्या वस्ताऱ्याने करण्याचे ब्रीद घेऊन हे बंधू काम करत आहेत

विजय पाटील

सांगली : सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना सर्वसामान्य आणि शेतकऱ्याच्या आवाक्या बाहेर सोने गेले आहे. पण त्यांची सोन्याच्या वस्तराने दाढी व्हावी आणि त्यांना आनंद मिळावा; या हेतूने सोन्याच्या वस्तराने दाढी केली जात आहे. (Sangli) सांगलीच्या रिळ्यातील नाभिक व्यावसायिक देसाई बंधूंनी हा अनोखा उपक्रम केला आहे. रिळेसारख्या ग्रामीण भागात हा आठ तोळ्याचा सोन्याचा (Gold) वस्तरा पाहण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी ग्राहकाची रीघ लागली आहे. सोन्यासारख्या ग्राहकांची सेवा सोन्याच्या वस्ताऱ्याने करण्याचे ब्रीद घेऊन हे बंधू काम करत आहेत. (Latest Marathi News)

सांगली जिल्ह्यातील शिराळा (Shirala) तालुक्यातील रिळे या ग्रामीण भागातील नाभिक समाजातील अशोक शंकर देसाई यांचे वडीलोपार्जित केसकर्तनालयाचे दुकान गेली अनेक दशके सुरू आहे. वडिलांनी सर्व आयुष्य या व्यवसायासाठी समर्पित केले आहे. कौटुंबिक परिस्थिती तशी बेताचीच! अशोक देसाई यांनी पत्नीच्या समर्थ साथ व अमोल आणि प्रदीप ही दोन मुलेही नाभिक व्यवसायाकडे वळले. जेमतेम शिक्षण असणारा थोरला मुलगा अमोल आणि धाकटा मुलगा प्रदीप गेल्या पंधरा- वीस वर्षापासून नाभिक व्यवसायात कार्यरत आहेत. प्रामाणिक व्यवसाय आणि तत्पर सेवा यामुळे तालुक्यातील ग्राहकांचा या दुकानात ओढा आहे. माफक दरामध्ये सेवा देण्यासाठी हे दुकान प्रसिद्ध आहे. या व्यवसायाबरोबर सामाजिक कामामध्येही सहभाग असतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साडेपाच लाख खर्चून बनविला वस्तरा 
एकीकडे सोन्याच्या भावाने (Gold Price) गगनभरारी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना ते आवाक्याच्या बाहेर गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (farmer) सोने घेता येत नाही. निदान सोन्याच्या वस्तराने त्यांची दाढी करावी, हा मानस मणी बाळगून गेल्या काही वर्षापासून व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून एखादा सोन्याचा दागिना बनवायचा मानस या दोघा भावांनी आई-वडिलांना बोलून दाखवला होता. दोघा भावांनी व्यवसाय करता करता मिळणाऱ्या पैशातून एक बचत संचयनी सुरू केली. दहा पंधरा वर्षाच्या व्यवसायातून त्यांनी चक्क आठ तोळ्याचा जवळपास साडेपाच लाखाचा दाढी करण्याचा सोन्याचा वस्तरा बनविला. हा सोन्याचा वस्तरा पाहण्यासाठी आणि सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी करण्यासाठी परिसरातील लोकांची दुकानात रीघ लागली आहे. अनेक ग्राहक वेटिंगमध्ये आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Ladki Bahin Yojana : ₹१५०० रुपयांचा बंद झालेला हप्ता व्हॉट्सअ‍ॅपवरून सुरू होणार? लाडक्या बहिणींनो, अर्ज करण्यापूर्वी हे नक्की वाचा

४ नोव्हेंबरपूर्वी ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होणार; E-KYC करावी लागणार का? जाणून घ्या नवी अपडेट

SCROLL FOR NEXT