School bus stuck on railway track Saam Tv
महाराष्ट्र

Sangli News: स्कूल बस रेल्वे रुळावर अडकली अन् समोरुन भरधाव रेल्वे आली; सांगलीत थोडक्यात अनर्थ टळला, थरारक VIDEO

Rohini Gudaghe

विजय पाटील, साम टीव्ही सांगली

सांगलीमध्ये स्कूल बस आणि रेल्वेचा अपघात थोडक्यात हुकल्याचं समोर आलंय. भरधाव स्कूल बस रेल्वेचं गेट तोडून रुळावर अडकली होती. तेवढ्यात समोरून भरधाव वेगात रेल्वे येत होती. परंतु बसमध्ये विद्यार्थी नसल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आलाय.

सांगलीत थोडक्यात अनर्थ टळला

सांगलीच्या पलूसमधल्या विठ्ठलवाडी रेल्वेगेटवर ही घटना घडली आहे. चालकाचा ताबा सुटल्यामुळे भरधाव स्कूल बस रेल्वे गेटला जाऊन धडकली आणि थेट रुळावर जाऊन अडकली होती. आमणापूर- विठ्ठलवाडी रेल्वे गेटवर गेट लावत असताना सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडलीय. थेट बस थेट रुळावर जाऊन अडकली (Sangli News) होती.

स्कूल बस रेल्वे रुळावर अडकली

दरम्यान याचवेळी या ठिकाणाहून जाणारी डेमो देखील काही अंतरावर दाखल झाली. पण, गेटमन आणि नागरिकांनी ती गाडी तात्काळ थांबवली. दुसऱ्या ट्रॅकवरुन रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली (School bus stuck on railway track) होती. दरम्यान रुळावरून अडकलेली बस नागरिकांनी मिळून हटवत रेल्वे रूळ मार्ग मोकळा केला. मात्र, या घटनेमुळे विठ्ठलवाडी-आमणापूर मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. तर बसमध्ये सुदैवाने विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना देखील टाळली आहे. पण, या घटनेमुळे सांगलीत एकच खळबळ उडाली होती.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात स्थानिकांची गर्दी

घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. एक स्कूल बस रेल्वे रुळावर अडकली होती. सुदैवाने बसमध्ये कोणीही नसल्यामुळे नसल्यामुळे मोठा (railway track) अनर्थ टळलाय. नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना थोडक्यात टळल्याचं समोर आलंय. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात स्थानिकांची गर्दी झाली होती. त्यांनी लोटत-लोटत स्कूलबस रेल्वे रूळावरून हटवली (Accident news) होती. घटनास्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. चालकाचा ताबा सुटल्यामुळे भरधाव बस रेल्वे रूळाच्या गेटवर जावून आदळली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT