sangli Police Saam tv
महाराष्ट्र

sangli Crime : सांगली पोलिस मुख्यालयात घुसून चोरी; तीन महिला अटकेत

Sangli News : मोटार वाहन परिवहन विभागाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आवारात जुनी वाहने लावण्यात आली होती

विजय पाटील

सांगली : सांगली विश्रामबाग येथे शेकडो पोलिसांचा राबता असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूस परिवहन विभागात घुसून चोरी करण्याचे धाडस तीन महिलांनी केले. या तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

सांगली (Sangli) पोलिस मुख्यालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस पोलिसांचा मोटार वाहन विभाग आहे. या विभागाच्या मागील बाजूस रेल्वे लाईन आहे. मोटार वाहन परिवहन विभागाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आवारात जुनी वाहने लावण्यात आली होती. या ठिकाणी घुसून संशयित तीन महिला मोटार वाहन विभागाजवळ आल्या. त्यानंतर आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून वाहनांचे सुटे भाग काढून घेतले. सुटे भाग काढून घेतल्यानंतर त्या पळून जात होत्या. तेवढ्यात पोलिसांनी (Police) हा प्रकार पाहिला. 

पोलिसांनी (Sangli Police) ओरडल्यानंतर महिला पळून जाण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र पोलिसांनी पाठलाग करून गीता अनिल कुंचिकोरवी (रा. सुभाषनगर, मिरज), सुनीता भारत पवार (रा. वडर कॉलनी, वांगीकर प्लॉट, सांगली) आणि राधा मार्तंड माळी (रा. वांगीकर प्लॉट, वडर कॉलनी, सांगली) या तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिलांकडे वाहनांच्या सीट, टायर मॅगवेल, पेट्रोलची टाकी, ॲल्युमिनिअमची तार असा १२ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तिघींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

SCROLL FOR NEXT