Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद; महिलेसह चौघांना अटक, मावळमधून तीन बांगलादेशी ताब्यात

Sangli News : विटा- कडेपूर मार्गावर सापळा रचून तिघात तरुणांना सोन्याच्या दागिन्यासह अटक करण्यात आली होती. एका महिलेच्या मदतीने सदर दागिन्यांची चोरी करण्यात आल्याची कबुली तरुणांकडून देण्यात आली

विजय पाटील, दिलीप कांबळे

सांगली/मावळ : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करण्यात आल्याची घटना घडली होती. ही जबरी चोरी करणाऱ्या एका महिलेस चौघांच्या टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या चौघांकडून सुमारे पाच लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर मावळमध्ये घुसखोरी करून राहणाऱ्या तीन बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले आहे. 

विटा- कडेपूर मार्गावर सापळा रचून तिघात तरुणांना सोन्याच्या दागिन्यासह अटक करण्यात आली होती. एका महिलेच्या मदतीने सदर दागिन्यांची चोरी करण्यात आल्याची कबुली तरुणांकडून देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता तिघांनी कडेगाव, विटा आणि इस्लामपूर येथे देखील चार ठिकाणी चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह पाच लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे.

मावळात तीन बांगलादेशी घुसखोर ताब्यात 
मावळ
 : मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे गावातून तीन बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे. नवलाख उंबरे येथे मागील सहा महिन्यांपासून हे बांगलादेशी नागरिक वास्तव्यास होते. नवलाख उंबरे याठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक राहत असल्याची तक्रार तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे आली. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी तपास केला असता त्यांना हे तीन बांग्लादेशी इसम आढळून आले. 

आधार कार्ड बनवून देणाऱ्यांचा शोध 

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडे कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांच्याकडे बांग्लादेशमधील रहिवासी पुरावे मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. हुसेन शेख, मोनिरुल गाठी, अमीरुल साना अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी इसमांची नावे आहेत. या बांगलादेशी इसमांना भारतीय आधार कार्ड व पॅन कार्ड बनवून देणाऱ्या इसमाचा शोध आता पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT