Sadabhau Khot Saam tv
महाराष्ट्र

Sadabhau Khot : राज्यपाल तरी करा, नाही तर आमची अवस्था बँडवाल्यासारखी होईल - सदाभाऊ खोत

Sangli News : आमदार पृथ्वीराज देशमुख हे खासदार आणि गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील. असे सांगत आपल्याला किमान राज्यपाल तरी करा; अशी मिश्कील भावना आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली

विजय पाटील

सांगली : कोणी कितीही देव पाण्यात ठेवू दे, देवा भाऊ एक दिवस गोपीचंद पडळकर यांना मंत्री करणार. मात्र मला कुठं तरी राज्यपाल तरी करा, नाही तर आपली अवस्था बंद बॅडवाल्यासारखी होईल; अशा मिश्कील शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केली आहे. सांगलीच्या विटा येथे बोलत होते.

सांगली जिल्ह्यातील विटा येथे आमदार गोपीचंद पडळकर यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे खासदार आणि गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील. असे सांगत आपल्याला किमान राज्यपाल तरी करा; अशी मिश्कील भावना व्यक्त केली. त्यामुळे व्यासपीठावर आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

जयंत पाटील सध्या तळ्यात मळ्यात : गोपीचंद पडळकर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर अनेक बडे नेते अजित पवार यांच्यासोबत आले. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. तरी देखील अनेकांची घुसमट सुरु आहे. यावरच गोपीचंद पडळकर यांनी भाष्य करताना शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते असलेले जयंतराव पाटील यांचे देखील सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे, अशी मिश्किल टिपणी पडळकर यांनी सांगलीच्या विटामध्ये नागरी सत्कार वेळी बोलताना केली आहे. 

जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवायचा 

सांगलीच्या विटा येथे भव्य नागरी सत्कार गोपीचंद पडळकर यांचा करण्यात आला होता. यावेळी सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख आणि भाजपचे नेते मंडळी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर मिश्किल टिपणी करत सध्या जयंत पाटील यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवायचा आहे; यासाठी तयारीला लागा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अधिकाऱ्यांना मारले, आता फेरीवाले आम्हाला पण मारणार, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची महासभेत विनवणी

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT