Shaktipeeth Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Shaktipeeth Mahamarg : मणेराजुरी येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको; नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध

Sangli News : ८०२ किलोमीटर लांबीचा नागपूर ते गोवा ‘शक्तिपीठ महामार्ग’ बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये केली होती. शेतकऱ्याची जमीन भूसंपादित करण्याची प्रक्रिया सुरु आहे

विजय पाटील

सांगली : नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्ग घेण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. या विरोधात आज सांगलीच्या मणेराजुरी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या रस्ता रोको आंदोलनामध्ये सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

नागपूर ते मुंबई ‘समृद्धी महामार्गा’प्रमाणे ८०२ किलोमीटर लांबीचा नागपूर ते गोवा ‘शक्तिपीठ महामार्ग’ बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये केली होती. यानंतर महामार्गाची लागणाऱ्या जमिनीकरिता शेतकऱ्याची जमीन भूसंपादित करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. मात्र या महामार्गाला सुरवातीपासूनच शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यानुसार आज सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

साधारण ८०२ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग तयार करण्यात येणार असून तासगाव तालुक्यातील मणेराजुरी हे सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाचा केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणार आहेत. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा. सरकारकडून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे काम थांबवावं; अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

महामार्गावरील वाहतूक ठप्प 

सांगलीच्या मणेराजुरी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गसाठी जमिनी जात असलेले सर्व शेतकरी सहभागी झाले होते. महामार्गाला विरोध करत सुमारे एक तास शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं होतं. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT