Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: गांजा विक्री करणारा रिक्षा चालक ताब्‍यात; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

गांजा विक्री करणारा रिक्षा चालक ताब्‍यात; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

विजय पाटील

सांगली : मिरच बसस्‍थानक परिसरात रिक्षातून गांजा विक्रीसाठी नेला जात होता. या दरम्‍यान पोलिसांनी (Police) सापळा रचून कारवाई करत रिक्षा चालकाला ताब्‍यात (Miraj) घेतले आहे. शिवाय पोलिसांनी तीन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. (Maharashtra News)

मिरज एसटी स्टँड परिसरातून रिक्षामधून गांजा विक्री करण्याकरिता जात असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी पोलिस ठाणे येथे मिळाली होती. त्यानुसार मिरज एसटी स्टँड परिसरात पोलीस पथक तयार करून सापळा रचण्यात आला. ऑटो रिक्षा एसटी स्टँडजवळ आली असता पथकाने रिक्षा अडवून रिक्षा चालक वैभव राजू कनशेट्टी (वय ३०, रा. मिरज) याला ताब्यात घेतले.

सात किलो गांजा जप्‍त

रिक्षाची झडती घेतली असता एका पोत्याच्या प्लास्टिक पिशवीत एक लाख ७० हजार रुपये किंमतीचा ६ किलो ८०० ग्राम वजनाचा गांजा अढळून आला. या गुन्हात वापरलेले सुमारे दीड लाख रुपये किंमतीची रिक्षा असा ३ लाख २० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार वैभव राजू कनशेट्टी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबत अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT