Milk Adulteration
Milk Adulteration Saam tv
महाराष्ट्र

Milk Adulteration: दुध भेसळ अड्ड्यावर छापा; १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत दुध भेसळ अड्ड्यावर (Sangli News) छापा टाकला. दुधामध्ये भेसळ करण्यासाठी आणलेली पावडर व इतर साहित्य असे एकूण १ लाख ६० हजाराचा मुद्देमाला हस्तगत करत कारवाई केल्याने आटपाडी (Atpadi) तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Live Marathi News)

सांगली जिल्‍ह्यातील बनपुरी येथे झालेली कारवाई ही दूध (Milk) व्यवसायातील भेसळ करणाऱ्या छोट्या केंद्रावर कारवाई झाली आहे. मात्र असे अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील दुध सेंटर चालक संजय पडळकर हा दुधात भेसळ करून भेसळयुक्त दूध एका मोठ्या केंद्राला पाठवत होता. या शिवाय दुधाची विक्री मोठ्या प्रमाणात करत असल्याची असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली होती.

दीड लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्‍त

अन्न व औषध प्रशासनाने बनपुरी येथील संजय पडळकर याच्या दुध सेंटरवर छापा मारला. यावेळी अन्न व औषध प्रशासनाला दुधामध्ये भेसळ करण्यासाठी दूध भेसळ सोल्यूशन, रिफाइंड खोबरेल तेल व डेअरी पर्मीट पावडर तसेच भेसळयुक्त गाय व म्हशीचे दुध असा एकूण एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. दरम्यान सदर भेसळ दूध सापडलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. सदरची कारवाई ही अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त श्री. मसारे यांच्यासह मेघना पवार व चन्नवीर स्वामी यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Chakankar: EVM ची केली पूजा, रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Live Breaking News : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ पर्यंत ५३.४० टक्के मतदान

'Met Gala 2024' मधील Alia Bhatta चं सौंदर्यापाहून अप्सरा आणि मस्तानीही ठरतील फेल

Shweta Tiwari: सुपरबोल्ड श्वेता तिवारी; हॉट अदांनी उडवली झोप!

DC vs RR,IPL 2024: सामन्याआधीच राजस्थानचं टेन्शन वाढलं! दिल्लीच्या या स्टार खेळाडूंचं होणार कमबॅक, पाहा प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT