Shahaji Patil Ajit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Shahaji Patil News : भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची महत्त्वकांक्षा, मात्र शिंदेंचे नेतृत्व भक्कम; शहाजी बापूंचा अजित दादांना अप्रत्यक्ष टोला

भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची महत्त्वकांक्षा, मात्र शिंदेंचे नेतृत्व भक्कम; आमदार शहाजी बापूंचा अजित दादांना अप्रत्यक्ष टोला

विजय पाटील

सांगली : भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची महत्त्वकांक्षा असते मात्र सध्याचे शिंदेंचे नेतृत्व भक्कम आहे आणि सर्वांना न्याय देणारे आहे. त्यामुळे येणारी २०२४ ची निवडणूक महायुती मुख्यमंत्री शिंदेंच्या (Ajit Pawar) नेतृत्वात लढवेल आणि विजयी होईल असे सांगत आमच्या सरकारकडे मोठे बहुमत असल्याने सरकारला कसलाही धोका नसल्याचे (Shahaji Patil) शहाजी बापू पाटील यांनी सांगितले. (Breaking Marathi News)

भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेल्या पोष्टरवरून सांगोलाचे आमदार शहाजी पाटील यांनी उपमख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. ते सांगलीत (Sangli News) फॅबटेक मल्टीस्टेट सोसायटीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. याचबरोबर अजित दादांनी आमदारांना केलेल्या निधी वाटपाचे स्वागत करीत सर्व आमदार समाधानी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

निधी वाटपावर समाधानी 

जयंत पाटील यांना निधी आणि जितेंद्र आव्हाड यांना निधी दिला नाही. यावर बोलताना ग्रामीण आणि शहरी निधीमध्ये फरक असतो. त्यामुळे भविष्यात नगरविकासमधून निधी मिळेल. मात्र मी तरी समाधानी असल्याचे शहाजी बापूंनी सांगितले. राज्यात एकीकडे पावसाचा हाहाकार आहे. मात्र सांगोला तालुक्यात पावसाची ओढ असल्याने येथील शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी; अशी मागणीही शहाजी बापू पाटील यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: सांगलीमध्ये घरात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

दोन लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल शानदार व्याजदर; 'या' बँकेने आणलीय धमाकेदार योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Property Rules: 'कुलमुखत्यारपत्र' म्हणजे काय रं तात्या? जमीन,मालमत्तेच्या व्यवहारात कसा होतो फायदा?

SCROLL FOR NEXT