Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : शिवस्वराज्य यात्रेची सांगता; शरद पवार, जयंत पाटील कार्यकर्त्यांना काय आदेश देणार?

sangli News : ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन सुरू शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली

Rajesh Sonwane

रुपाली बडवे
सांगली
: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात काढण्यात येत असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची शेवटची सभा होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आज वाळवा- इस्लामपूर मतदारसंघात हि सांगता सभा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, खासदार धैर्यशील मोहिते पाटील असे दिग्गज नेते या सांगता सभेला उपस्थित राहणार असून आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पहिलीच सभा असल्याने यात कार्यकर्त्यांना काय संदेश देणार याकडे लक्ष लागून आहे. 

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (Sharad Pawar) वतीने ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन सुरू शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली होती. प्रदेशाध्यक्ष नेतृत्वात जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत जयंत पाटील आणि खासदार कोल्हे यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवले. राज्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव, युवकांची बेरोजगारी, (Sangli News) महाराष्ट्रातून परराज्यात जाणारे रोजगार, महिलांवरील अत्याचार या सर्व गोष्टी त्यांनी लोकांसमोर मांडून भ्रष्ट सरकारच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केला. 

आचारसंहिता सुरु झाल्यानंतर पहिली सभा 

दरम्यान ९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या यात्रेचे इस्लामपूरपर्यंत २४ दिवस पूर्ण झाले आहेत. शिवस्वराज्य यात्रेने या २४ दिवसात १९ जिल्हे पूर्ण केले आणि तब्बल ७ हजार ३६५ किलोमीटरचा प्रवास गाठला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे बलस्थान असलेल्या सर्व मतदारसंघात ही यात्रा पोहचली असून पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन या मतदारसंघांमध्ये केले आहे. यात कालच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार आणि जयंत पाटील यांची ही पहिलीच सभा असणार आहे. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रेची ही सांगता सभा असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच या सभेत फोडला जाईल. आता या सभेत शरद पवार आणि जयंत पाटील हे दोन्ही प्रमुख नेते कार्यकर्त्यांना काय आदेश सोडणार यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT