Sangli News MSRTC Bus Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : सातारा, पुणे मार्गावरील बससेवा थांबविली; मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटीचा निर्णय

Sangli news : सातारा, पुणे मार्गावरील बससेवा थांबविली; मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटीचा निर्णय

विजय पाटील

सांगली : जालन्यातील मराठा आंदोलनातील लाठीचार्ज प्रकारामुळे राज्यभरात आंदोलन तीव्र झाले आहे. अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. तर काही (Sangli) ठिकाणी हिंसक वळण मिळाल्याने बसची (St Bus) जाळपोळ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कराड आणि सातारा येथे सुरू असणाऱ्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीहून (Satara) सातारा, पुणेकडे जाणाऱ्या बस थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज पुन्हा एकवटला आहे. यात जालना येथे सुरु केलेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामुळे राज्यभरात आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटलं आहेत. सांगलीत देखील याचे पडसाद उमटत असून बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सकाळच्या सर्व बस या इस्लामपूर बसस्थानकात थांबवण्यात आल्या असून एसटी महामंडळाच्या जिल्हा प्रशासनाकडून तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. तर सोलापूर आणि कोल्हापूर मार्गावर नियमित बस सेवा सुरू आहे.

आंदोलन बंद होईपर्यंत बसही उभ्या 

सकाळी पाच आणि सहा वाजेच्या दोन शिवशाही पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. त्यानंतर पुण्याकडे जाणाऱ्या बसेस आंदोलन सुरू (Jalna News) झाल्यामुळे इस्लामपूर बसस्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलन संपल्याशिवाय सांगलीहून पुण्याकडे कोणत्याही बस न पाठवण्याबाबत पोलीस विभागाने सुद्धा सुचित केले आहे. दुसरीकडे बारामतीकडे जाणाऱ्या बस सुद्धा विटा आगारात थांबवण्यात आल्या असून त्या परत बोलवण्यात आल्या आहेत. बारामतीमध्ये सुद्धा आंदोलन सुरू असल्याने सांगली जिल्ह्यातून बारामतीकडे जाणाऱ्या बसेस या विटा खानापूर आगारात थांबवण्यात आल्या आहेत. जोपर्यंत सातारा कराड मार्गावरील आंदोलन थांबत नाही. तोपर्यंत सांगली आगारातून पुण्याकडे बस पाठवल्या जाणार नाहीत; अशी माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT