Mahalakshmi Express Saam tv
महाराष्ट्र

महालक्ष्मी एक्सप्रेस 5 जूनपासून विद्युत शक्तीवर धावणार

महालक्ष्मी एक्सप्रेस 5 जूनपासून विद्युत शक्तीवर धावणार

विजय पाटील

सांगली : कोल्हापूर– मुंबई रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. या मार्गावर मुंबई– कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस 4 जूनपासून नियमितपणे धावणार आहे.. तसेच कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस 5 जूनपासून विद्युत लाईनवर नियमितपणे धावणार असल्‍याची माहिती रेल्वेच्या (Railway) अधिकार्‍यांनी दिली आहे. (sangli news Mahalakshmi Express will run on electric power from June 5)

कोल्हापूर- मुंबई या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे. त्या मार्गावर मधल्या काळामध्ये चाचणी घेण्यात आली होती. ती यशस्वीरीत्या झाली आहे. या मार्गावर काही गाड्या धावल्या होत्या. तसेच रेल्वे रुळाच्या कामादरम्यान चेन्नई एक्सप्रेस मधल्या काळामध्ये धावली होती. आता मुंबई– कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस 4 जूनपासून धावणार आहे. तर कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस 5 जूनपासून नियमितपणे धावणार आहे.

क्रॉसिंगचा विलंबही टळेल

प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार असून यामुळे वेळेमध्ये बचत होईल. तसेच रेल्वे क्रॉसिंगमध्ये होणारा विलंबही टाळता येणार आहे. भविष्यामध्ये या मार्गावर एक्सप्रेसही धावतील. यामुळे सांगली, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार असून प्रवाश्याची बचत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT