Kundal Water Scheme Saam tv
महाराष्ट्र

Kundal Water Scheme : कुंडल योजनेचा वीज पुरवठा खंडित; १३ गावांकडे तब्बल पावणे तीन कोटींची थकबाकी

Sangli News : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल प्रादेशिक योजना फार जुनी योजना आहे. या योजनेवर पलूस तालुक्यातील जवळपास १३ गावे व वाड्या- वस्त्यांना पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात येतो

विजय पाटील

सांगली : ऐन नव्या वर्षाच्या तोंडावर सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल प्रादेशिक योजनेचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने पुन्हा खंडित केला आहे. योजनेवरील थकीत रक्कम वाढत असल्याने वीज खंडित करण्यात आली आहे. यामुळे दुधोंडीसह पलूस तालुक्यातील तेरा गावे व वाड्या- वस्त्यांवरील पिण्याचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरवातीलाच नागरिक विशेषतः महिला वर्गाला पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल प्रादेशिक योजना फार जुनी योजना आहे. या योजनेवर पलूस तालुक्यातील जवळपास १३ गावे व वाड्या- वस्त्यांना पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात येतो. ही योजना जुनी असल्याने मध्यंतरी या योजनेचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र, या योजनेच्या वीज बिलाची रक्कम जवळपास पावणे तीन कोटींच्या दरम्यान आहे. मागील काही महिन्यांपासून महावितरणकडून थकीत रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. 

ग्रामस्थांना करावी लागणार भटकंती 

इतकी मोठी रक्कम एकदम भरणे शक्य नसल्याने प्रत्येक गावाकडून वसुली झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही रक्कम महावितरण'ला भरणे गरजेचे असताना वसुली नसल्याने रक्कम भरली जात नाही. त्यामुळे 'महावितरण'कडून विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे या योजनेवर असणाऱ्या सर्व तेरा गावांना पाणी पुरवठा बंद झाला आहे. परिणामी पाणी मिळविण्यासाठी या गावातील नागरिकांना भटकंती करावी लागते आहे.

पंधरा दिवसांपूर्वीची वीजपुरवठा केला खंडित 

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी देखील महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने पाणीपुरवठा आठवडाभर बंद होता. थकीत बिलातील काही रक्कम भरल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला होता. मात्र, नवीन वर्षाच्या तोंडावर पुन्हा वीजपुरवठा खंडित केल्याने दोन- तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह विशेषतः महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT