Sangli Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात मुसळधार; कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर, काही गावांचा संपर्क तुटला

Sangli News : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कृष्णाकाठ परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत असलेली कृष्णा नदी पात्राबाहेर पडली आहे. यामुळे दोन गावांचा संपर्क तुटला आहे.

सांगली (Sangli) जिल्ह्यातील पलूस तालुक्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी कृष्णा नदीला (Krishna River) देखील पूर आला आहे. मागील चोवीस तासात नदीच्या पाणी पातळीत सुमारे साडे चौदा फुटांची वाढ झाली आहे. पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून नागठाणे व शिरगाव या गावाचा संपर्क तुटला आहे. नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यावर पाणी आले असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. नागठाणे गावाचा शिरगावशी संपर्क तुटला आहे.

बुर्ली, आमणापूर, धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोट मळ्यांमध्ये पाणी शिरू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मळ्यांमध्ये लागवड केलेली पिके देखील पाण्याखाली गेली आहेत. तसेच आमणापूर येथील स्मशानभूमीत देखील नदीचे पाणी शिरले आहे. मागील चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर (Heavy Rain) वाढलेला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT