Sangli Rain Saam tv
महाराष्ट्र

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार; कृष्णा नदीची पाणीपातळी १८ फुटांवर, अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग

Sangli News : मागील तीन- चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढला आहे. तर काही ठिकाणी संततधार सुरु आहे. विदर्भ, नागपुरात पावसाने हाहाकार माजविला

विजय पाटील

सांगली : कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत चालला आहे. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी दिवसभरात तीन फुटांनी वाढून पाणी पातळी १८ फुटावर गेली आहे. 

मागील तीन- चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. तर काही ठिकाणी संततधार सुरु आहे. विदर्भ, नागपुरात पावसाने हाहाकार माजविला असून सांगलीत (Sangli) देखील पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाऊस जोरात सुरू झाल्यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या नागरिकांच्या मनामध्ये महापुराची भीती निर्माण झाली आहे. यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या प्रत्येक नागरिकांचे सध्या अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याकडे लक्ष आहे. 

अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग सुरु 

कृष्णा खोऱ्यातील (Krishna River) पावसाचा विचार करून कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातील (Almatti Dam) पाणीसाठा १.९ टीएमसीने कमी करून शनिवारी ९७ टीएमसी ठेवला आहे. धरणात सध्या ७९ टक्के पाणीसाठा आहे. धरणात पाण्याची आवक जास्त असल्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टीतून १ लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कथित महाराज किशोर जाधव शिवणीकर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT