Hingoli News Gram Sabha Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : सरपंच महिलेनं का दिला राजीनामा?, भर ग्रामसभेत नवऱ्याच्या कृत्याचा पर्दाफाश केल्यानं खळबळ

Hingoli News : देशात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यासाठी सरकारने कायदा लागू केला, मात्र या कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्याआधीच पायमल्ली होत असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीत पुढे आला

संदीप नागरे

हिंगोली : सतरा हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या हिंगोलीच्या गोरेगाव ग्रामपंचायतीत महिला सरपंच पद राखीव होते. यामुळे (Hingoli) महिलेची निवड करण्यात आली होती. मात्र या महिला सरपंचाला पतीने मारहाण करत राजीनामा देण्यास भाग पडले. पत्नीने याबाबत ग्रामपंचायतीच्या (Grampanchayat) विशेष सभेत खुलासा केल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनंतर मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

देशात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यासाठी सरकारने कायदा लागू केला, मात्र या कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्याआधीच पायमल्ली होत असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीत पुढे आला आहे, जिल्ह्यातील १७ हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या हिंगोली तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच गंगुबाई कावरखे या सरपंचपदावर विराजमान होत्या. मात्र त्यांना पतीने मारहाण करत सरपंचपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत (Gram Sabha) स्वतः महिला सरपंचाने खुलासा करत सरपंचपदाचा राजीनामा देण्यास दबाव टाकणाऱ्या पतीवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रशासनाने राजीनामा घेतला मागे 

दरम्यान गोरेगावमधील नागरिकांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मागील अडीच वर्षापासून गोरेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर विराजमान आहोत. यापुढे देखील गावात विकासात्मक कामे करण्यासाठी मला सरपंचपदी पूर्ण कार्यकाळ होईपर्यंत कर्तव्य पार पाडायचे आहे. त्यामुळे पतीच्या दबावापोटी आपण दिलेल्या राजीनामा नामंजूर करावा; अशी विनंती महिला सरपंच गंगुबाई कावरखे यांनी केली. यानंतर आता प्रशासनाने हा राजीनामा नामंजूर केला आहे. मात्र या प्रकारानंतर गोरेगावसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. पत्नी असलेल्या महिला सरपंचाला मारहाण करत राजीनाम्यासाठी दबाव आणणाऱ्या महिला सरपंचाचे पती रामराव कावरखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच राज्याच्या महिला आयोगाने देखील संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन कार्यवाही करण्याची मागणी गोरेगावमधील महिला ग्रामस्थांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT