Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: चक्क महाराजांना घ्यायला पाठविले हेलिकॉप्टर; किर्तनासाठी वेळ होत असल्याने आयोजकांचा पुढाकार

चक्क महाराजांना घ्यायला पाठविले हेलिकॉप्टर; किर्तनासाठी वेळ होत असल्याने आयोजकांचा पुढाकार

विजय पाटील

सांगली : सांगलीत सुरू असलेली रामकथा सोडून महाराजांना दोन तासांच्या आत पुण्यातील वाघोली (Wagholi) येथे कीर्तनासाठी येणे अशक्य होते. हे पाहून आयोजकांसह भाविकांनी पुढाकार घेत केज येथील कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना ५५ मिनिटांत वाघोलीला हेलिकॉप्टरने आणत भाविकांना सुखद धक्का दिला आहे. (Live Marathi News)

केज (Kej) तालुक्यातील रामकथाकार, कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांची (Sangli) सांगली येथे रामकथा सुरू आहे. त्यांना पुण्यातील वाघोली येथे सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवात गुरूवारी कीर्तनाचे निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, सांगली ते वाघोली हे अंतर पाच तास १७ मिनिटांचे होते. शर्मा महाराज यांची गुरुवारची रामकथा सायंकाळी पाच वाजता संपणार होती. दोन तासांत महाराजांना कारने वाघोली येथे पोहोचणे आवश्यक होते.

मग पाठविले हेलिकॉप्‍टर

कारने हा प्रवास करण्यासाठी महाराजांना पाच तास लागणार होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन महाराजांच्या कीर्तनासाठी आयोजक शांताराम खटके व भाविकांनी त्यांच्यासाठी थेट सांगली ते वाघोली अशी महालक्ष्मी कंपनीच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. त्यामुळे समाधान महाराज शर्मा हे केवळ ५५ मिनिटांत वाघोली येथे कीर्तनासाठी सायंकाळी पोहचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT