Sangli Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Sangli Heavy Rain : चांदोलीत अतिवृष्टी कायम; वारणा, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

Sangli News : सांगली जिल्ह्यात मागील दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार पाऊस सुरूच आहे. या परिसरात दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कायम आहे. त्यामुळे चांदोली धरण आता ८२ टक्के इतके भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

सांगली (Sangli) जिल्ह्यात मागील दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान चांदोली धरण (Chandoli Dam) क्षेत्रात गेल्या २४ तासात ११० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने धरणातून ३ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. शेतीमध्ये पाणी शिरल्याने शेतीच नुकसान होत आहे. 

कृष्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

दुसऱ्या बाजूला कृष्णा काठाला (Krishna River) थोडासा दिलासा मिळाला आहे. कालपासून वाढणारी पाण्याची पातळी आता कमी होऊ लागली आहे. आयर्विन पुल येथे साडे २७ फुटांवर पोचलेली पाण्याच्या पातळीमध्ये आता अर्धा फुटाने घटली आहे. त्यामुळे सांगलीच्या जनतेला दिलासा मिळाला आहे. मात्र आज पहाटेपासून कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पाऊसाची रिपरिप कायम आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT