Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli Gutkha Seized: तब्बल एक कोटी १७ लाखाचा गुटखा जप्त

Sangli Police Seized Gutkha: तब्बल एक कोटी १७ लाखाचा गुटखा जप्त

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या कवठेमहांकाळ पोलिसांनी नागज फाटा येथे मोठी कार्यवाही करून तब्बल एक कोटी १७ लाखाचा गुटखा (Sangli) पकडला आहे. यामध्ये दोन कंटेनर आणि सुगंधी तंबाखू, सुपारी असा एकूण एक कोटी ३७ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कवठेमहांकाळ पोलीस आणि सांगली एलसीबीची (LCB) राज्यातील मोठी कारवाई करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

रत्नगिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नागज फाट्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांना यांना एका खबर्यामार्फत या मार्गावरून गुटख्याच्या कंटेनर जाणार असल्याचे माहिती मिळाली. या माहितीनुसार कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक यांच्यासह सांगली एलसीबीचे पोलिस याच्या पथकाने सापळा रचला. विजापूर येथून जतमार्गे या महामार्गावर दोन कंटेनर जात होते. यावेळी पोलिसांनी कंटेनर अडवले. पोलीस खाक्या दाखवताच यामध्ये एका कंपनीचा गुटखा आहे. तो पुण्याकडे वाहतूक करत असल्याचे या संशयित आरोपींनी सांगितले.

ही कारवाई राज्यातील एक मोठीं कारवाई असून कवठेमहांकाळ पोलिसांच्या (Police) इतिहासातली सर्वात मोठी ही कारवाई असल्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी सांगितले. कवठेमहांकाळ पोलिसांनी या कंटेनरचे चालक आणि वाहक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT