Sangli Crime Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime : सांगली हादरले; दहावीतील मुलीवर अत्याचार, पीडितेने घटनेनंतर संपविले जीवन, चार जण ताब्यात

Sangli News : त्रासाबद्दल मुलीने रविवारी रात्री वडीलांना मुलांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती. याबाबत दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाणार होते.

विजय पाटील

सांगली : दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलीवर एका नराधमाकडून अत्याचार करण्यात आला होता. या घटनेनंतर सदर पीडित मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणीमध्ये घडली आहे. या घटनेने सांगली परिसरात खळबळ उडाली असून तालुक्यात घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात मात्र दिरंगाई  केल्याने पोलिसांची चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. 

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी येथे हि धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान पिडित मुलगी एका गावात कुटुंबासोबत शेतात राहत होती. ती गावातच माध्यमिक शाळेत दहावी मध्ये शिकत होती. गेल्या काही दिवसांपासून काही तरुण तिचा पाठलाग करत त्रास देत होते. तसेच घरी मोबाईल वरून फोन करून त्रास दिला जात होता. त्यामुळे मुलगी अस्वस्थ होती. यातील राजू विठ्ठल गेंड हा तिच्यावर दबाव टाकून शरीरसुखाची मागणी करत होता. मात्र तिने विरोध केला होता. त्यानंतर राजू गेंडा याने जबरदस्तीने तिला एका गावातील खोलीवर नेत अत्याचार केला.

पोलिसात तक्रार देण्यापूर्वीच संपविले जीवन 

दरम्यान होणाऱ्या त्रासाबद्दल मुलीने रविवारी रात्री वडीलांना मुलांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती. याबाबत दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाणार होते. मात्र त्यापूर्वीच म्हणजे सोमवारी सकाळी मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी नराधमांवर कारवाईच्या मागणीसाठी आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा देखील काढला होता.

चौघांना घेतले ताब्यात 
दरम्यान या घटनेप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये याप्रकरणी राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात (सर्व रा. करगणी) आणि अनिल नाना काळे (रा. बनपुरी) यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांकडून चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यातील एकाला संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप दिल्याने त्याच्यावर सांगलीत उपचार सुरू आहेत, तर तिघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा, यासाठी कळव्यात आगरी-कोळी बांधवांचा कॅण्डल मार्च..

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विलिनीकरणासाठी पवारांवर आमदार-खासदारांचा दबाव?

Asia Cup Final : पाकिस्तान चारमुंड्या चित, भारतानं आशिया चषकावर कोरलं नाव, शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय

SCROLL FOR NEXT