Sangli Crime News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: शिवसेना प्रमुखासह चौघांवर जीवघेणा हल्ला; पैशाच्या देवाणघेवाणीतून घडला प्रकार

शिवसेना प्रमुखासह चौघांवर जीवघेणा हल्ला; पैशाच्या देवाणघेवाणीतून घडला प्रकार

Rajesh Sonwane, विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये शहर शिवसेना प्रमुखासह चौघांवर खुनी हल्ला झाला. पैशाच्या देवाणघेवाणीतून हा प्रकार घडला आहे. हल्ल्यात चाकू, लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला असून याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Sangi News Shiv Sena)

शिवसेना (Shiv Sena) शहर प्रमुख असलेले संजय चव्हाण यांनी प्रमोद सावंत याला हातउसने दिलेले पैसे मागितले. यावेळी सावंत याने चव्हाण यांना शिवीगाळ केली. त्यानंतर सावंत याला जाब विचारण्यासाठी चव्हाण यांची मुले अभिषेक व पवन हे त्याठिकाणी (Sangli) आले. यावेळी वादावादीस सुरुवात झाली. हा वाद मिटवण्यासाठी चव्हाण पुढे आले. यावेळी सावंत याने चव्हाण यांना उद्देशून ‘कसले पैसे मागतोस, तुला आलेले पैसे पक्षाचेच आहेत तुला दाखवतोच, आज तुम्हाला जिवंत ठेवत नाही', अशी धमकी (Crime News) दिली.

प्रमोद सावंत यांच्यासोबत आलेल्या रोहित सावंत याने संजय चव्हाण यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने पोटावर वार केला. चव्हाण यांनी तो वार वाचवला. त्यानंतर रोहितने केलेला वार चव्हाण यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला लागला. याचवेळी प्रदीप दरेकर याने लोखंडी रॉडने चव्हाण यांच्या डोक्यात मारले. यावेळी चव्हाण यांना वाचवण्यासाठी आलेला त्यांचा मुलगा अभिषेक यालाही प्रमोद दरेकर व अन्य एका अनोळखी व्यक्तीने लोखंडी रॉडने मारले. तर चव्हाण यांचा दुसरा मुलगा पवन यालाही अनोळखी व्यक्तीने लोखंडी रॉडने मारले. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या किरण साळुंखे यांना प्रमोद सावंत याने डाव्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी सहा जणांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar tourism: धबधबा, हिरवळ आणि धुक्याची चादर; छत्रपती संभाजीनगरमध्ये या ५ ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जा

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Bad cholesterol: महिलांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर ही ५ विचित्र लक्षणं दिसून येतात?

महिलांमधील 'या' 5 सवयी नवऱ्याला बिलकूल आवडत नाही

Maharashtra Politics: ठाकरेसेना अन् काँग्रेसला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह १५० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सोडली साथ

SCROLL FOR NEXT