Sangli News
Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: सांगलीत रास्ता रोको आंदोलन; विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

विजय पाटील

सांगली : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलेला आहे. सांगली (Sagnli News) इस्लामपूर रोडवरील लक्ष्मी फाट्या येथे स्वाभिमानी शेतकरी (Farmer) संघटनेतर्फे चक्काजाम करण्यात आले. (Maharashtra News)

५० हजार प्रोत्साहन अनुदान तातडीने शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावेत, वीज कनेक्शन मोहिम थांबवावी, ऊस तोडनीसाठी पैसे मागणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत, द्राक्षाला हमी भाव जाहीर करावा, एक रकमी एफआरपी अश्या विविध मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आल्‍या आहेत. यासाठी राज्‍यभर आंदोलन पुकारले आहे.

सरकार विरोधात घोषणाबाजी

या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. तर यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. आंदोलन ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Onion Export News | शेतकऱ्यांना दिलासा! कांदा निर्यातबंदी हटवली...

Health Tips: पिकलेली की कच्ची कोणती केळी आहे आरोग्यासाठी फायदेशीर?

kitchen Hacks: लंचबॉक्समध्ये दिलेले सफरचंद काळे पडतेय? मग या टिप्स करा फॉलो

Elvish Yadav : एल्विश यादवच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

Special Report : Hatkanangale Lok Sabha | हातकणंगलेत होणार तिरंगी लढत

SCROLL FOR NEXT