Miraj News Saam tv
महाराष्ट्र

Miraj News : पाण्याच्या बॉटल बॉक्सच्या आडून बनावट दारूची तस्करी; मिरजेत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Sangli News : मद्य विक्री व वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील छुप्या पद्धतीने मद्याची वाहतूक केली जात आहे. इतकेच नाही तर बनावट दारूची तस्करी केल्याचे अनेकदा समोर आले आहे

विजय पाटील

सांगली : पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या आडून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत बनावट दारूची तस्करी रोखली आहे. राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाने कारवाई केली आहे. बियर, विस्की असे दारूचे बॉक्स आणि ट्रक असा एकूण ६८ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मद्य विक्री व वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील छुप्या पद्धतीने मद्याची वाहतूक केली जात आहे. इतकेच नाही तर बनावट दारूची तस्करी केल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यानुसारच सांगली जिल्ह्यातील मिरज येथे बनावट दारूची तस्करी केली जात असताना हि रोखण्यात पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला यश मिळाले आहे. 

सापळा रचून पकडला साठा 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगलीचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप पोटे, उप-अधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त माहितीगाराकडून गोवा व मध्यप्रदेशातील बनावट दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने मिरज- पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग वरती सापळा लावुन कारवाई करण्यात आली. 

६८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत 

गोवा आणि मध्य प्रदेश राज्य निर्मिती विदेशी मद्य भरलेला सहा चाकी ट्रक पकडण्यात आला. यामध्ये विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे व बिअरचे एकूण ६५१ बॉक्स जप्त करण्यात आले. यात साधारण ३३ लाख रुपये किंमतीचा मद्यसाठा आणि सहा चाकी ट्रक असा एकूण ६८ लाख ४१ हजार २८० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार यांना अटक करण्यात आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Akshay Kumar: अक्षय कुमारच्या लेकीकडे अश्लील फोटोंची मागणी, आरोपी गजाआड; खिलाडीने सांगितली A टू Z माहिती

Jio Recharge: jio च्या ₹459 रिचार्जमध्ये मिळणार 61GB डेटा, वाचा संपूर्ण माहिती

Sanjay Dutt : ३३ वर्षांनंतर 'बल्लू' तुरुंगातून फरार; लांब केस अन् वाढलेले दाढी, संजय दत्तला पाहून थरकाप उडेल | VIDEO

Shocking : मुलगी दिसायला सुंदर, वाईट नजर पडू नये म्हणून आई बापाने केलं लेकीचं टक्कल; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT