Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : तरुणांच्या धाडसाला सलाम! पुरात वाहून जाणाऱ्या वृद्धाला वाचवले, Video Viral

Sangli News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात गुरुवारी दुपारी पावसाचे वातावरण निर्माण होत आभाळ भरून आले होते. दुपारनंतर मात्र पावसाने जोरदार आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागात हजेरी लावण्यास सुरवात केली होती

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या आटपाडी तालुक्यामध्ये गुरुवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मापटेमळा येथील पुलावरून पाणी वाहत होते. याचवेळी दुचाकी वरून घराकडे जात असलेले किसन माळी हे वृद्ध पाण्याच्या प्रवाहाने वाहून चालले होते. यावेळी धाडस दाखवून युवकांनी आपला जीव धोक्यात घालून या वृद्धाला वाचवले.

सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात गुरुवारी दुपारी पावसाचे वातावरण निर्माण होत आभाळ भरून आले होते. दुपारनंतर मात्र पावसाने जोरदार आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागात हजेरी लावण्यास सुरवात केली होती. पाऊस थोडा ओसरल्यानंतर आटपाडी येथे पंचायत समितीच्या शेजारी असलेली चहाची टपरी बंद करून दुचाकीवरून किसन माळी हे मापटेमळा येथील घरी चालले होते. जोरदार (Rain) पाऊस झाल्याने मापटेमळा येथील पुलावरून पाणी वाहत होते. पाऊसही त्याच वेळी सुरू झाल्याने किसन माळी यांना पाण्याचा व प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांनी मोटारसायकल पाण्यात घातल्याने पाण्याच्या प्रवाहाने मोटारसायकल वाहून चालली होती.

या ठिकाणी उपस्थित असलेल्या युवकांनी तात्काळ पुलाकडे धाव घेत अगदी पुलाच्या दुसऱ्या टोकाला गेलेल्या किसन माळी यांना पकडत त्यांना वाहून जाण्यापासून वाचवले. पाण्याचा वेग व प्रमाण वाढल्याने त्यांना बाहेर काढताना युवकांना मोठी कसरत करावी लागली. मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता युवकांनी वृद्ध किसन माळी यांना वाचविल्याने त्यांच्या कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT