Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : विना नंबरची गाडी पकडण्यावरून गोंधळ; पडळकरांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप

Sangli News : प्रचाराच्या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी गाड्यामधून रोख रक्कम नेली जात असल्याचे आढळून आले आहे.

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या जतमध्ये विना नंबरची गाडी पकडण्यात आली आहे. गाडी पकडल्यानंतर याठिकाणी प्रचंड गोंधळ उडाला असून भाजपा बंडखोर अपक्ष उमेदवार तामनगौडा रवी पाटलांच्या कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची वादावादी झाली. दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्याकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान उमदी पोलिसांकडून गाडी ताब्यात  घेण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा थांबल्यानंतर अंर्तगत गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. दरम्यान या प्रचाराच्या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी गाड्यामधून रोख रक्कम नेली जात असल्याचे आढळून आले आहे. यानंतर एका दिवसावर मतदान येऊन ठेपले असताना (Sangli News) सांगली जिल्ह्यातील जतमध्ये विना नंबरच्या कारमध्ये रॊख रक्कम आढळून आली आहे. सोन्याळ येथे विना नंबर प्लेटची असणारी गाडी तामनगौडा रवी पाटील समर्थकांकडून पकडण्यात आली. यामुळे अपक्ष उमेदवार तामनगौडा रवी पाटलांच्या कार्यकर्ते व (Police) पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला होता. 

पैसे वाटपाचा आरोप सोन्याळ या ठिकाणी विना नंबर प्लेटच्या गाडीतून भाजपचे प्रचार साहित्य आणि पैसे वाटप होत असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांनी केला आहे. जतमध्ये भाजप उमेदवार गोपीचंद पडळकरंकडून पैसे वाटप होत असल्याचे तमन्नगौडा रवी पाटलांचा यांचे म्हणणे आहे. तर ताब्यात घेतलेल्या गाडीतील १ कोटी रुपये पोलीसांचा गाडीतून अन्यत्र हलवण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक कुदळे यांनी ताब्यात घेतलेल्या गाडीतील पैशांची बॅग स्वतःच्या गाडीतून पाठवल्याचा आरोप तमन्नगौडा रवी पाटील यांनी केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

SCROLL FOR NEXT