Chandoli Tourist Spot Saam tv
महाराष्ट्र

Chandoli Tourist Spot : सांगलीचे चांदोली पर्यटन स्थळ आता बंद; पुढील चार महिने पर्यटनास जाण्यास मनाई, काय आहे कारण?

Sangli news : पावसाळ्याच्या कालावधीमध्ये व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील पर्यटन बंद असते. पर्यटन हंगाम १४ जून रोजी समाप्त झाला आहे. पावसाळ्यात जंगलातील कच्चे रस्ते, नाले यामुळे वाहनांच्या येण्या- जाण्यावर निर्बंध

Rajesh Sonwane

सांगली : पर्यटकांचे आकर्षण असलेले सांगली जिल्ह्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील जंगल सफारी आजपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. यामुळे पर्यटकांना आता पुढील चार महिन्यांपर्यंत येथे फिरण्यासाठी जाता येणार नाही. अर्थात आक्टोबर महिन्यानंतरच पर्यटकांसाठी हे स्थळ खुले करण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील यांनी दिली. 

सांगली जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची चांदोली येथील जंगल सफारी पर्यटनासाठी दरवर्षी पावसाळ्यात बंद करण्यात येत असते. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील पर्यटन बंद असते. या वर्षाचा पर्यटन हंगाम १४ जून रोजी समाप्त झाला आहे. पावसाळ्यात जंगलातील कच्चे रस्ते, नाले यामुळे वाहनांच्या येण्या- जाण्यावर निर्बंध येतात. अशावेळी कच्चे रस्ते खराब होतात. यामुळे हि बंदी करण्यात येत असते. 

जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची भीती 

तसेच जंगलातील जैवविविधतेला वाहनांमुळे धोका निर्माण होतो. पावसाळा हा लहान जीव, सरपटणारे प्राणी आणि अन्य वन्य जीवांचा प्रजननाचा कालावधी असतो. या कालावधीत त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी सुद्धा पर्यटन बंद ठेवले जाते. दरवर्षी हा निर्णय वनविभागाकडून घेण्यात येत असतो. 

या तारखेपर्यंत आहे बंदी 

चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. पावसाळा सुरू झाल्याने आजपासून उद्यान पर्यटकांसाठी बंद होणार असून चार महिन्यांचा या कालावधीत म्हणजेच आजपासून १५ ऑक्टोबर या चार महिन्याच्या कालावधी करिता बंद राहणार आहे; अशी माहिती सह्याद्री व्याघ्र राखीवचे वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील यांनी दिली आहे. १५ ऑक्टोम्बरनंतर पर्यटकांना फिण्यासाठी जात येणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT