Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: हातात स्‍टेअरींग असतानाच बस चालकाला आले चक्कर; प्रवाशांची आरडाओरड अन्‌..

हातात स्‍टेअरींग असतानाच बस चालकाला आले चक्कर; प्रवाशांची आरडाओरड अन्‌..

विजय पाटील

सांगली : बस चालवित असतानाच बस चालकाला चक्कर आली. तीस प्रवाशांना घेवून धावत असलेल्‍या बसमध्‍ये (St Bus) अचानक झालेल्‍या या प्रकारामुळे सगळे प्रवाशी आरडाओरड करू लागले अन्‌ पुढे जे घडले त्‍यामुळे प्रवाशांच्‍या काळजाचा ठोका चुकला. (Letest Marathi News)

सांगलीच्या (Sangli) खानापूर तालुक्यातील भिवघाटजवळ धक्कादायक घटना समोर आली. दोन दिवसांपूर्वी परळी-चिपळूण ही बस प्रवाशी घेवून भिवघाटमार्गे विट्याकडे येत होती. परंतु ती येत असतानाच चालकाला अचानकच चक्कर आली. अचानक असे काय झाले म्हणून बसमधील सर्व प्रवाशी भयभीत झाले.

अन्‌ वाहकाने घेतला बसचा ताबा

घटनेचे गांभीर्य ओळखून शेजारीच वाहक कम चालक असणाऱ्या कंडक्टरने बसचा ताबा घेतला व बस बाजूला घेतली. तात्काळ त्याच अवस्थेत बस चालवित भिवघाट येथे आणण्यात आली. त्यामुळे चालक आणि वाहकासह तब्बल ३० जणांचे प्राण वाचले आहेत. सदरच्या चालकावर त्वरीत उपचार करण्यात आले. सध्या बसचा चालक सुखरुप असून या घडलेल्या घटनेने मात्र प्रवाशांची मोठी दैना उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News : मीरारोडमध्ये मोठा राडा! मुलीच्या छेडछाडीवरून दोन गटात हाणामारी; २० रिक्षांची तोडफोड

Kapoor Family: फॅम जॅम...! बॉलिवूडच्या कपूर खानादानाचा रॉयल दिवाळी फेस्ट लूक

Relationship Tips: सणासुदीला नवरा-बायकोमध्ये भांडणं का होतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Maharashtra Politics: ऐनदिवाळीत राजकीय वादाचा धमाका! माजी आमदारांच्या प्रवेशांवरून भाजपात फुटला वादाचा बॉम्ब; निष्ठावंतांची नाराजी

Maharashtra Live News Update : विरारमध्ये अग्नीतांडव! फर्निचर दुकानं जळून खाक

SCROLL FOR NEXT