Sangli News Saam tv
महाराष्ट्र

अजब परंपरा..स्‍मशानात लागतो विवाह; आली रे आली भुताची आई तडकड ताई आली

अजब परंपरा..स्‍मशानात लागतो विवाह; आली रे आली भुताची आई तडकड ताई आली

विजय पाटील

सांगली : सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरलीय. हि दहशत कोणी चोरट्याची किंवा पोलिसांची अथवा भुताची नसून दहशत आहे तड्कडताईची. जेष्ठ महिन्यात आषाडीच्या अमावास्येला दैत्याचा संहार करण्यासाठी म्हैशासुर मार्दीनी तड्कडताईचा वेश घेऊन शहराची रखवाली (Sangli News) करण्यासाठी फिरत असते. (sangli news ashadh amavashya marriage takes place in the cemetery tadkad tai)

अंगावर साडी, तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली (Sangli) शहरात धावणारी हि आहे तड्कडताई. जेष्ठ महिन्यात अमावस्येला सांगलीत भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरवात होते. तडकड ताई, भुताची आई असा गजर करत लहान मुले या तडकडीचे स्वागत करतात. कुंभार घराण्याकडे तडकडीचा हा मान असतो. ही परंपरा गेल्या 250 वर्षांपासून सांगलीत सुरू आहे. (Karnataka) कर्नाटकमधील बदामी येथून 7 वाट्या मानव लोकांनी पळवून आणल्या होत्या. त्यातली वाटी एक सांगली, आष्ठ, कासेगाव, पलूस, कवठेपिरान अश्या ठिकाणी आल्या आहेत. त्यावेळी पासून ही प्रथा सुरू आहे.

तडकड ताईचा दरारा

दैत्य लोक त्यावेळी मानवाला त्रास करत होते. त्यावेळी चौडेश्वर देवी वाट्याच्या रुपात या गावामध्ये आली आणि मानवाच्या संरक्षण करण्यासाठी हा अवतार घेत असते. अमावस्येचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आषाढातल्या पौर्णिमेपर्यंत शहरातील ठराविक भागात जाऊन ती जोगवा मागते. तडकड ताईचा दरारा हा खूप मोठा असतो. अनेक लहान मुलेच नाहीत, तर मोठी मुलेही या तड्कडताईला प्रचंड घाबरतात. संस्थान काळापासून सुरु असलेली हि परंपरा आता २१ व्या शतकातही जपली जात आहे.

स्‍मशानात लागतो विवाह

सांगली शहरात जोगण्या उत्सव हा जेष्ठ अमावास्येला संध्याकाळी ४ वाजता सुरु होतो. काळी साडी हातात सूप आणी चेहर्याला तडकडीचा मुखवटा अशा वेशात तड्कडीच्या लग्नाची वरात काढण्यात येते. कुंभारखिंड, सांभारे गणपती, सिटी हायस्कूल मार्गे थेट स्मशानात संध्याकाळी ६ वाजता या तडकडताईच्या लग्नासाठी शेकडो आबालवृद्ध हजार असतात. सूर्यस्ताला जात असताना गव्हाच्या अक्षताने तिचा विवाह पार पडतो. विवाह पार पडल्यानंतर खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या सुपाने प्रसाद देते. या सुपाचा मार बसला कि मुलांवरील इडा पिडा टळते अशी अख्याइका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT