Amit Deshmukh Saam tv
महाराष्ट्र

Amit Deshmukh : लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेसची भूमिका मोठ्या भावाची; अमित देशमुख यांचा दावा

Sangli News : राज्यात सत्ता आमचीच राहणार असा दावा महायुती व महाविकास आघाडीकडून केला जात आहे

विजय पाटील

सांगली : लोकसभेमध्ये जितक्या जागा काँग्रेसला मिळाल्या त्याचप्रमाणे विधानसभेलाही आम्ही तेवढ्या जागा जिंकू. त्यामुळे नक्कीच आमची भूमिका मोठ्या भावाची राहील; असे वक्तव्य काँग्रेसचे युवा नेते अमित देशमुख यांनी आज सांगली येथे बोलताना केले आहे. 

काँग्रेसचे (Congress) युवा नेते माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगलीत आज पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात सत्ता आमचीच राहणार असा दावा महायुती व महाविकास आघाडीकडून केला जात आहे. त्यानुसार राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल; असा दावा करत यात लोकसभेप्रमाणे काँग्रेसची भूमिका महत्वाची राहणार असल्याचे अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी सांगितले. 

सांगलीतही माविआचाच विजय 
तसेच राज्यातील जनता महायुतीला कंटाळली असून यंदा राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येईल, असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला. तर सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार हे पृथ्वीराज बाबाच असून ते २३ तारखेला विधानसभेत आमदार म्हणून जातील; असा विश्वासही अमित देशमुख यांनी वाजत केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा होण्याचा मार्ग मोकळा! e-KYC पूर्ण; 'एवढ्या' महिलांना मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार

Abhijeet Dipke: तू भाजपात ये नाही तर तुला गोळ्या घालू, अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप

ITR filing: ITR भरण्यासाठी उरले २४ तास; फक्त १० मिनिटांत घरबसल्या रिटर्न भरा, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Railway Accident : नागपुरात भयंकर दुर्घटना! रेल्वे रुळावर २ भावांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले; नेमके काय घडले?

SCROLL FOR NEXT