MP Vishal Patil Saam tv
महाराष्ट्र

MP Vishal Patil : अलमट्टीची उंची वाढविण्यावरून भाजपचे राजकारण; खासदार विशाल पाटील यांचा आरोप

Sangli news : लवादाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रासह कोणत्याही राज्याने उंची वाढवण्यास विरोध केला नसल्याचा खुलासा केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर दिल्याने खळबळ उडाली आहे

विजय पाटील

सांगली : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. तर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यावरून केवळ भाजपकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला आहे.  

कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याला कृष्णा पाणी लवादाने देखील मंजुरी दिली आहे. लवादाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रासह कोणत्याही राज्याने उंची वाढवण्यास विरोध केला नसल्याचा खुलासा केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर दिल्याने खळबळ उडाली आहे. यावरून खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत अलमट्टीबाबत केवळ भाजपकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला आहे. 

सांगली, कोल्हापूर जिल्हे होणार जलमय 

अलमट्टी धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला. पाच मीटरने उंची वाढवल्यास अलमट्टीची पाणी पातळी शिरोळ बंधाऱ्यापर्यंत येणार असल्याचा दावा जलतज्ञांनी केला. यामुळे सांगली व कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे पावसाळ्यात जलमय होऊ शकतात. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. 

महाराष्ट्राकडून विरोध अपेक्षित आहे 

संसदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्राचा विरोध असून तांत्रिक समिती नियुक्त करण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी मात्र महाराष्ट्रासह कोणत्याच राज्याने अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत विरोध करण्याचा प्रस्ताव दिलेला नाही. असा खळबळजनक दावा केला. खरंतर महाराष्ट्राकडून उंची वाढवण्यास विरोध व्हायला अपेक्षित होता. परंतु तो झाला नाही, असेही खासदार विशाल पाटील यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT