Maharashtra Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Sangli News: अय्यो! ओढ्याच्या पाण्यात वाहून आल्या ५०० च्या नोटा, आटपाडीकरांना लॉटरीच लागली; पैसे गोळा करायला तुफान गर्दी

Maharashtra Latest News: ओढ्यामध्ये नोटा सापडत असल्याची बातमी सर्वत्र पसरली ज्यानंतर या नोटा गोळा करण्यासाठी एकच धांदल उडाली. परिसरातील तरुण, ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनीही ओढ्यामध्ये उतरत नोटा गोळा करण्यास सुरुवात केली.

विजय पाटील

सांगली: सांगलीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यामधील एका ओढ्यात चक्क पाचशे रुपयाच्या नोटा वाहून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आटपाडीच्या गदिमा पार्कच्या समोरून जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून पाचशे रुपयच्या नोटा वाहून आल्या. या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आटपाटी शहरातील गदीमा पार्कच्या समोरून जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून पाचशे रुपयच्या नोटा वाहून आल्याचा आश्चर्यकारक प्रकार समोर आला. शनिवारी सकाळपासून या ओढ्यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटा वाहून येत असल्याचे निदर्शनास आले, ज्यानंतर या नोटा गोळा करण्यासाठी एकच गडबड उडाली आहे. या ठिकाणी बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती.

शनिवारी आटपाटीचा आठवडे बाजार असल्याने परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात शहरात येतात. यावेळीच ओढ्यामध्ये नोटा सापडत असल्याची बातमी सर्वत्र पसरली ज्यानंतर या नोटा गोळा करण्यासाठी एकच धांदल उडाली. परिसरातील तरुण, ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनीही ओढ्यामध्ये उतरत नोटा गोळा करण्यास सुरुवात केली. यावेळी एका तरुणाला तब्बल १०, ००० रुपयांच्या नोटा सापडल्याचीही बातमी समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची यशस्वी घोडदौड; २२व्या दिवशीही छप्परफाड कमाई, वर्ल्डवाइड कलेक्शन किती?

Virar Tourism : नारळाची झाडं, खळखळणाऱ्या लाटा; विरारमध्ये लपलंय निसर्गरत्न, 'हे' आहे वीकेंड ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

Maharashtra News Live Update: गुलाबराव पाटील यांनी मुलासाठी मागितली उमेदवारी

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! पेट्रोल-डिझेलनंतर आता CNGही महागला, जाणून घ्या नवीन दर

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न; IRGCनं रचला होता कट

SCROLL FOR NEXT