Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli News : रिळेत 5 गव्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू; विषबाधेचा अंदाज

विषबाधा झाल्याने या गव्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

Sangli Latest News : सांगलीच्या शिराळा तालुक्यातील रिळे येथील पाटील दरा नामक शिवारात गेल्या दोन दिवसांमध्ये पाच गवे संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आले. विषबाधा झाल्याने या गव्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. तपासणी करून या गव्यांचे जागेवरच दहन करण्यात आले. (Latest Sangli News)

दरम्यान, रविवार पावलेवाडी खिंडीत वयोमानामुळे मृत झालेला गवा आढळला होता. दोन दिवसांत सहा गव्यांचे (Bison) मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काल (२० फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रिळे येथील वनविभागच्या लगत दोन नर व १ मादी असे तीन गवे संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती वनविभागास मिळाली.

घटनेची माहिती मिळताच वनविभागच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शोधाशोध केली असता परिसरात एकूण पाच गवे संशयितरित्या मृतावस्थेत आढळून आले. मृत गव्यांपैकी दोन गव्यांचे मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची प्राथमिक तपासणी करून अहवाल तयार करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी अंबादास माडकर, शुभांगी अरगडे यांनी मृत झालेल्या सर्व गव्यांची उत्तरीय तपासणी केली असता या गव्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा पराभव भोवणार, तिघांपैकी कुणाची विकेट पडणार? टीम इंडियात मोठा उलटफेर होणार

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

SCROLL FOR NEXT