Food Poisoning Sangali Saamtv
महाराष्ट्र

Food Poisoning: सांगली शहरातील वानलेसवाडी हायस्कूलमधील 32 मुलांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

Sangali News: दुपारच्या जेवणात भात आणि आमटी खाल्ल्याने ३३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विजय पाटील, सांगली

Sangali News: दुपारच्या जेवणात भात आणि आमटी खाल्ल्याने ३३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. सांगलीमधील वानलेसवाडीमधील हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत त्रास होऊ लागल्यानंतर सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 32 विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात पालकांनी मोठी गर्दी केली आहे तसेच अन्न औषध प्रशासन अधिकारी, आणि पोलिस रुग्णालयात दाखल झाले आहेत. (Sangali News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीमधील वानलेसवाडी हायस्कुलमधील मुलांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हायस्कुलमध्ये दिलेल्या डाळ-भातातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुलांना मळमळ, उलटी, पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्यानंतर सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 32 विद्यार्थी उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पालकांनी परिसरात मोठी गर्दी केली आहे. ही सर्व मुले 5 वी ते 7 वी च्या वर्गात शिकत असल्याची माहिती समोर आली आहे, तसेच अन्न औषध प्रशासन अधिकारी, पोलिसही रुग्णालयात दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान, सध्या या सर्वांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली आहे.घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली होती. यातील काही विद्यार्थ्यांना आता डिस्चार्ज देखील देण्यात आलाआहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्रलंबित, शेतकऱ्यांच्या खात्यात ₹4,000 कधी येणार?

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT