Miraj News Saam tv
महाराष्ट्र

Miraj News : आश्रम शाळेतील १७ विद्यार्थ्यांना एकाच वेळी कावीळची लागण; मिरजेतील रुग्णालयात उपचार सुरू

Sangli News : अनिवासी आश्रम शाळा असून शाळेमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत ५४५ हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी १६ ते १७ विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, ताप असा त्रास जाणवू लागला होता

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातला बेडग येथील आश्रम शाळेतल्या १७ विद्यार्थ्यांना एकाच वेळी कावीळ आजाराची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या सर्व विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान एकाच वेळी १७ विद्यार्थ्यांना काविळीची लग्न कशामुळे झाली, याचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. 

सांगली जिल्ह्यातील मिरजच्या बेडग मधील स्वामी समर्थ शिक्षण संस्थेची समर्थ आश्रम शाळा आहे. बेडग मधल्या मालगाव रस्त्यावर समर्थ अनिवासी आश्रम शाळा असून या शाळेमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत ५४५ हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी १६ ते १७  विद्यार्थ्यांना १४ फेब्रुवारीपासून उलट्या, जुलाब, ताप असा त्रास जाणवू लागला होता. प्राथमिक उपचार सुरु असताना २७ फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली. 

गावात उडाली खळबळ 

प्रकृती गंभीर झाल्याने सर्व विद्यार्थ्यांना मिरज शासकीय रुग्णालयाबरोबर खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात या सर्व विद्यार्थ्यांना कावीळची लागण झाल्याचे निदान झाले. तर एकाच वेळी १७ विद्यार्थ्यांना कावीळची लागण झाल्याने बेडग गावात खळबळ उडाली आहे. यामध्ये १० ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

दूषित पाण्यामुळे लागण झाल्याची शक्यता 

दरम्यान दूषित पाण्यामुळे कावीळची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज संस्था चालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर या १७ विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आल्याचेही स्वामी समर्थ शिक्षण संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

Aloo Tikki Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आलू टिक्की; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT